औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी आणखी नवीन सात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २२७१ वर गेली.
एकीकडे बाजारपेठ उघडण्यात आली आहे. दुसरीकडे अजूनही अनेकजण पाहिजे तेव्हढि काळजी घेत नसल्याचे समोर येत आहे. अशा परिस्थितीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ११४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या २२६४ वर गेली होती. मात्र यात आता दुपारी पुन्हा ७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२७१ वर गेली आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ११८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर ८७० रुग्णांवर उपचार सुरू आहे.
या भागातील सात रुग्ण
दुपारनंतर आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये कैलासनगर गल्ली नंबर-३ येथील-१, रोशन गेट -१, पुंडलिक नगर-१, खोकडपुरा-१, जय हिंद नगर, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर एन 2, सिडको -१, सिल्क मिल कॉलनी-१, नंदीग्राम कॉलनी, गारखेडा परिसर-१ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २ महिला आणि ५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.